पंकजा मुंडे यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करणे शिक्षकाला पडलं महागात

जि. प. शिक्षक संतोष ताठे यांना कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करणे जि. प. शिक्षक संतोष ताठे यांना चांगलंच महागात पडलं आहे.पंकजा मुंडे व सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी जि. प. शिक्षक संतोष ताठे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Rohan Deshmukh

नेमकं काय म्हटलं आहे  संतोष ताठे यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये ?

मंत्री व सचिवांच्या फोटोसह व्हायरल केलेल्या पोस्टमुळे समाजामध्ये शासनाविरोधी संदेश गेला आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आणि सचिवांच्या भेटीचा संदर्भ देऊन शासन धोरणाच्या विरोधात शिक्षकांना भडकावण्याचा या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा आरोप संतोष ताठे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारची पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी सदरील शिक्षकाने आवश्यक परवानगी न घेतल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचा भंग केला असून, आपणास सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबत ७ दिवसात गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत खुलासा करावा. 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...