fbpx

शेजाऱ्याची बेहिशोबी मालमत्ता दाखवा आणि जिंका एक करोड रुपये

वेबटीम- मोदी सरकार बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्यावर करडी नजर ठेऊन आहे. बेहिशोबी मालमत्ता समोर यावी या करता नोटाबंदी देखील करण्यात आली. त्यानंतर जाहीर आव्हाना  करण्यात आले जे कोणी आपली बेहिशोबी मालमत्ता जाहीर करेल त्याला थोडीशी सूट देखील देण्यात आली. अनेक मार्ग वापरून देखील बेहिशोबी मालमत्ता तितक्या प्रमाणात समोर आली नाही

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आता एक नवीन प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सदर केला आहे. हा प्रस्ताव असा आहे की शेजाऱ्याची बेहिशोबी मालमत्ता दाखवा आणि जिंका एक करोड रुपये. जो व्यक्ती शेजाऱ्याच्या बेहीशोबी मालमत्तेची माहिती केंद्रीय मंडळाला देईल त्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल. याबरोबरच त्या व्यक्तीला १ करोड रुपयाचे बक्षीस दिले जाईल. याआधी अशा प्रकारचे बक्षीस दिले जात होते. पण बक्षिसाची रक्कम १ करोड इतकी मोठी नव्हती.जो या बेहिशोबी मालमत्तेची माहिती देईल ती माहिती अचूक व पक्की असावी. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हा प्रस्ताव मांडला असून या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसून मान्यता मिळाल्या नंतर त्यांची घोषणा करण्यात येईल,