मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करून घ्या,’ अशी ऑफरचं भातखळकरांनी जाहीर केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्टकरून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘आदित्य ठाकरे यांची मुंबई उपनगराच्या पालकमंत्री नेमणूक होऊन आज दीड वर्षे उलटून गेली. या काळात केवळ एक वेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही.’
हरवलेले पालकमंत्री @AUThackeray कुणाला दिसले का तौक्ते वादळानंतर ? सापडले तर सांगा आम्हालाही… pic.twitter.com/Ep7vbmVtMP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021
‘मागील वर्षी मे महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मालवणी, गोराई या परिसरातील मच्छीमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले, मालाड मध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले, झाडे पडल्यामुळे ४८ तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून, घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न आहेत,’ अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
यासोबतच, ‘लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईतील नागरिक अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडपडून, होरपळून मृत्युमुखी पडत असताना मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर व रुग्णालयांना भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे,’ असं आव्हान देखील त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्याचा ठाकरे सरकारचा विचार
- कोरोना विरुद्धच्या लढ्यात बीसीसीआयची ‘ही’ मोठी मदत
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे