धक्कदायक! छिंदमचा राजीनामा महापौरांजवळ प्राप्तच झाला नाही

खासदार गांधी यांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर

अहमदनगर: भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र उपमहापौरपदाचा राजीनामा आपल्यापर्यंत पोहोचलाच नसल्याचा धक्कादायक खुलासा महापौर सुरेखा कदम यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्याचे भाजपाकडून खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. तसेच छिंदमने दिलेल्या राजीनाम्याची प्रत माध्यमांकडे पाठवण्यात आली होती. मात्र छिंदम याने दिलेला पदाचा राजीनामा प्राप्त झाला नसल्याचा धक्कादायक माहिती महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले.

२४ तास उलटून गेल्यानंतरही शनिवारी महापालिकेत राजीनामा धडकलाच नाही. त्यामुळे खा. गांधी यांनी केलेली घोषणा तर केली मात्र त्याची अमलबजावणी झालीच नाही. नियमानुसार राजीनामा महापालिकेत देणे आवश्यक होते. मात्र छिंदमनी राजीनामा खा.गांधीकडे दिला. त्यामुळे खा. दिलीप गांधी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी गटाने केली आहे.

You might also like
Comments
Loading...