जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन दहशतवाद्यांना मारावे का?

टीम महाराष्ट्र देशा : दहशतवादी हातात बंदूक, बॉम्ब घेऊन तिथ अभे असल्यावर आमच्या जवानांनी निवडणूक आयोगाला विचारून त्यांना गोळी मारावी का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज काश्मीर मध्ये भारतीय जवानांनी तिथे असलेल्या काही दहशतवाद्यांना मारले असता विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. आणि आता १९ में रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या लोकसभा मतदार संघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा होत आहेत. याचदरम्यान उत्तरप्रदेशमधील काशीनगर येथे पंतप्रधान मोदींची जाहीर सभा झाली. त्यावेळी काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी तेथील दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचा उल्लेख केला.

काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांना आमच्या जवानांनी ठार मारले हे मला आज सकाळी समजले. आणि काही लोकांना यावरून अडचण निर्माण झाली आहे. देशात आज सहाव्या टप्प्यातील मतदान होते आहे आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना का मारले जाते आहे? असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातोय.

दहशतवादी जर तिथे हातात बंदूक, बॉम्ब घेऊन उभे आहेत तर आमच्या जवानांनी निवडणूक आयोगाला जाऊन विचारावे का? मी त्यांना गोळी मारू का नको मारू? असा सवाल त्यांनी उपस्थिती केला. इतकेच नव्हे तर, जेव्हापासून आम्ही सत्तेत आलो आहोत. काश्मीरमध्ये प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सफाई अभियान सुरूच असते. हे सफाई अभियान माझे कामच आहे. असेही त्यांनी म्हंटले.