छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये- अजित पवार

अजित पवार

मुंबई: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आज महाराष्ट्राच्या अधिवेशनात शिवस्मारकाच्या उंचीच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु झाला. सरकार शिवस्मारकाची उंची कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

अजित पवार म्हणाले, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्या छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये. असे सरकारने केले तर जनता माफ करणार नाही. छत्रपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांचा असा अपमान सहन केला जाणार नाही. तसेच कंत्राटदार बदलला म्हणून त्याच्या सोयीप्रमाणे स्मारक व्हायला नको, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मांडली. यावर उत्तर देताना सरकारनं शिवस्मारकाची उंची कमी केलेली नाही असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तसंच शिवस्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असं मुनगंटीवार म्हणाले.