मी राजकारणात येऊ का ? दंबग पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांचा फॉलोअर्सना प्रश्न

टीम महाराष्ट्र देशा : पुणे पोलीस दलातून नुकतेच निवृत्त झालेले पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. खुद्द बर्गे यांनी फेसबुकवर पोस्ट करत ‘मी राजकारणात प्रवेश करू का ? अशी विचारणा आपल्या फॉलोअर्सला केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आखड्यात ते उभे टाकण्याची शक्यता वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना गळाला लावण्यासाठी कुरघोडीचे राजकारण जोरात रंगताना दिसत आहे. यामध्ये प्रशासनात काम केलेले अधिकारी देखील राजकारणात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. भानुप्रताप बर्गे यांची पोलीस दलातील कामगिरी धडाकेबाज राहिली आहे.

Loading...

१९ एन्काऊंटर, ४०० हुन अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार बर्गे यांच्या नावावर आहेत. पुणे शहरात काम करत असताना सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचा संपर्क राहिलेला आहे. आता निवृत्तीनंतर त्यांना राजकारणाचे वेध लागल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातुन भाजप अथवा शिवसेनेकडून ते लढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील