पंतप्रधानाचे चार वर्षातील सर्वात छोट भाषण; यामुळे मोदी कमी बोलले

p m modi at red fort

वेबटीम : पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे आपल्या भाषण कौशल्यामुळे भारत तसेच जगभरात प्रशिद्ध आहेत. लोकसभा असो कि मैदानावरील सभा मोदींच भाषण म्हणजे आक्रमक आणि लांबलचक असणार हे समीकरणच. मात्र  मंगळवारी देशाच्या  ७० व्या स्वातंत्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन दिलेलं भाषण हे गेल्या चार वर्षातील सर्वात छोटं भाषण ठरले आहे. मोदी हे ५७ मिनिटे बोलले असून गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी मोदींनी तब्बल ९६ मिनिटांचे लांबलचक भाषण दिले होते.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरुन पंतप्रधानांकडून केले जाणारे भाषण मोठे असते अशा तक्रारी मोदींकडे करण्यात आल्या होत्या. ‘मन की बात’मध्ये खुद्द मोदींनीच ही माहिती दिली होती. यंदाचे भाषण छोटेखानी असेल असे मोदींनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे आता ‘मन की बातम’ध्ये दिलेला शब्द पाळत मोदींनी फक्त ५७ मिनिटांचे भाषण केले. गेल्या चार वर्षातील मोदींचे हे सर्वात छोटे भाषण ठरले. गेल्या वर्षी मोदींनी ९६ मिनिटांचे भाषण केले होते.