पैठणमध्ये लसीचा तुटवडा

corona

औरंगाबाद : पैठण मध्ये गेल्या आठवड्यात संपलेला कोरोना लसीचा पुरवठा संपला व या आठवड्याच्या प्रारंभी पुन्हा पुरवठा करण्यात आला मात्र या आठवड्यात फर्मा कंपन्यांच्या कर्मचारी व कामगारांचा भार पैठणच्या लसीकरण केंद्रावर पडल्याने शहर व तालुक्यात लसीचा तुटवडा जानवत आहे.

कोरोना लसी विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लस घेणाNयांचे प्रमाण शहरासह तालुक्यात वाढलेलेले आहे. प्रारंभी शहरात केवळ शासकीय रुग्णालयात देण्यात येत असलेल्या लसीसाठी शहरात तीन केंद्र सुरु करण्यात आले. तिन्ही केंद्रांवर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने लसीचा तुटवडा जानवु लागल्याने गेल्या आठवड्या तालुकाभर लसीकरण बंद पडले होते व या आठवड्याच्या प्रारंभी एक हजार लसीचा कोठा पैठणसाठी आला होता.

मात्र त्यात औद्योगीक वसाहतीतील फर्मा कंपनीचे कर्मचारी यांना देखील शहरातील याच केंद्रातुन लस देण्यात येत असल्याने शुक्रवारी दि.१६ पुन्हा लसीचा तुटवडा जानवल्याने लसीकरण बंद करावे लागले आहे. लसीची आवक जावक याचा ताळमेळ आरोग्य प्रशासनाने करुन औद्योगीक वसाहतीतील फर्मा कंपन्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या