थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेस अल्प प्रतिसाद

औरंगाबाद: नागरिकांनी वेळेत कराचा भरणा न केल्यास मालमत्ताधारकांना व्याज व दंड आकारण्यात येतो.कर न भरल्यास २४ टक्के व्याज लागते. सद्यस्थितीला शहरातील सव्वालाख नागरिकांनी कर भरलेला नसून महापौर नंदकुमार घोड्ले यांनी नागरिकांनी मालमत्ता कर भरावा म्हणून अभय योजना सुरू केली आहे.

परंतु या योजनेस सुरू होऊन दोन दिवस होताहेत तरी नागरिकांनी अजून तरी प्रतिसाद दिला नसून योजना संपण्यास अजून भरपूर कालावधी असल्यामुळे नागरिक कर भरण्याची घाई करत नसावेत गेल्यावर्षी ८७ कोटी रुपये जमा झाले होते. आता ३० मार्चपर्यंत मालमत्ता करापोटी ७७.५० कोटी रुपये जमा झाले होते.परंतु या योजनेमुळे मनपाचे ९० कोटींचे नुकसान होणार असून नागरिकांनी कराचा भरणा केल्यास मनपाच्या तिजोरीत २५२ कोटी जमा होण्याची शक्यता आहे. मालमत्ताकराची सुमारे तीनशे कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी एक ते ३१ एप्रिल दरम्यान अभय योजना राबविण्यात येत आहे. त्यात थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्या व्यक्तीस व्याज व दंडामध्ये ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.अभय योजना समल्यानंतर मात्र १ जून पासून कठोर कारवाई केली जाणार आहे.

You might also like
Comments
Loading...