उत्तर प्रदेश: शूटर दादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रो तोमर यांच्या स्मरणार्थ (Shooting range to be set up by UP government in memory of shooter dadi)आता युपी सरकार ‘शूटिंग रेंज’ बनवणार आहे. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
“आंतरराष्ट्रीय शूटर स्व. चंद्रो तोमर ‘शूटर दादी’ यांच्या नावाने ‘शूटिंग रेंज’ बनवण्याचा निर्णय तसेच बागपत मधील रस्त्याला चंद्रो तोमर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सरकारद्वारा त्यांच्याप्रती ही खरी श्रद्धांजली आणि मातृशक्तिप्रती आदर भाव प्रकट करतो.”, असे ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
अंतरराष्ट्रीय शूटर स्व. चंद्रो तोमर 'शूटर दादी' जी के नाम से 'शूटिंग रेंज' बनाने का निर्णय तथा बागपत में उनके नाम पर ही एक सड़क मार्ग का नामकरण, भाजपा सरकार की उनके प्रति सच्ची श्रद्धांजलि और सम्पूर्ण मातृशक्ति के प्रति आदर भाव को प्रकट करता है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 29, 2022
कोण होत्या चंद्रो तोमर?
चंद्रो तोमर यांचा जन्म मुजफ्फरनगरमध्ये झाला होता. त्यांनी निशानेबाजीला सुरुवात केली तेव्हा त्यांचे वय 60 वर्ष होते. जगातील सर्वात वयोवृद्ध निशानेबाज म्हणून त्यांना ओळखले जाते. परंतु, यानंतरही त्यांनी अनेक स्पर्धांत भाग घेत आपले कौशल्य दाखवले. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील जोहरी खेड्यातील रहिवासी चंद्रो तोमर यांना 6 मुले आणि 15 नातवंडे आहेत. यापैकीच एक नात शेफालीला त्या डॉ. राजपाल यांच्या शूटिंग अकॅडमीत घेऊन गेल्या होत्या. येथे त्यांनी ट्रेनरच्या सांगण्यावरुन नेमबाजीला सुरुवात केली होती.त्यांनी २५ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला आणि सर्व स्पर्धा जिंकल्या.
‘सांड की आँख’ चित्रपट-
त्यांच्या आयुष्यावर आधारीत ‘सांड की आँख’ (Sand Ki Aankh movie)हा बॉलिवूड चित्रपटही बनवण्यात आला आहे. चित्रपटात भूमी पेडणेकर हिने चंद्रो तोमरची भूमिका साकारली होती. तसेच ‘सांड की आंख’ या चित्रपटात चंद्रो यांच्या नणंद प्रकाशीची व्यक्तिरेखा तापसी पन्नूने साकारली होती. प्रकाशी यांनी चंद्रो यांना बघून नेमबाजी शिकायला सुरुवात केली होती. दरम्यान चंद्रो तोमर यांचे ३० एप्रिल २०२१ रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ होईल असे बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण- संजय राऊत
- ‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा
- संभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी
- ‘मग गांजाच्या शेतीला विरोध का करायचा?’; संभाजी भिडे आक्रमक
- छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; मराठा क्रांती मोर्चा, एमआयएमचा विरोध!