#CoronaVirus : ‘नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ’

हैद्राबाद : करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी मोठी घोषणा केली. जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना इशारा दिला. ‘राज्यातील नागरिकांनी राज्याबाहेर जाऊ नये. तसेच कुणीही रस्त्यावर उतरु नका. कुणाला काही अडचण असेल तर 100 नंबरवर कॉल करा,’ असं आवाहन चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. ते याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना बोलत होते.

Loading...

पुढे ते म्हणाले, ‘लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ. अमेरिकेचे लष्कर बोलावून संचारबंदी लावण्यात येईल”, असा इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याबाबत वृत्त ‘tv9 मराठी’ प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, ‘नागरिकांनी राज्य सरकारला सहकार्य करा. जर कुणी सूचनांचे पालन केले नाही तर सैन्याला बोलावून गोळी मारण्याचे आदेश आम्हाला द्यावे लागतील,’ असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका