न्यूझीलंडमध्ये गोळीबार : अब अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही? – अख्तरचा सवाल

वेलिंग्टनः  न्यूझीलंड येथील दक्षिणेकडील क्रिस्तचर्च शहरातील दोन मशिदीत मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४०  जण ठार झाले असून २० जखमी झाले आहेत. न्यूझीलंड पोलिसांनी ४  जणांना ताब्यात असून, त्यात १  महिला तर ३  पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान,बांग्लादेशची  टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. गोळीबारात पूर्ण बांग्लादेशची  टीम थोडक्यात बचावली आहे. घटनास्थळी बांग्लादेशच्या  क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते.

 

हा फारच भीतीदायक अनुभव असल्याचं क्रिकेटर तमीम इक्बालनं सांगितलं आहे. खेळाडू बसमधून उतरून मशिदीत जाणार होते, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला. न्यूझीलंडमधल्या क्रिस्तचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून शोएब अख्तर यानेही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना मृतांना श्रंद्धांजली वाहिली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना अब अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही? असा सवाल केला.Loading…
Loading...