धक्कादायक: वापरलेल्या पीपीई किटची विल्हेवाट लावली घंटागाडीतून !

corona kit

अहमदनगर: कोरोनाने राज्यात २ लाख रुग्णांचा चिंताजनक आकडा पूर्ण केला आहे, हजारो लोक देशभरासह राज्यात मृत्युमुखी पडत आहेत. हा रोग अतिशय धोकादायक असून योग्य काळजी घेणे हे गरजेचं असून देखील अहमदनगरमध्ये संताप येईल असा निष्काळजीपणा प्रशासनानेतर्फे केली जात आहे.

अहमदनगरमध्ये महापालिकेच्या कोविड चाचणी केंद्रात स्रावाचे नमुने घेण्यासाठु वापरलेल्या पीपीई किटची घंटागाडीतून विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने रामकरण सारडा येथे पोजीटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची कोविड चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट सेंटर सुरु केले आहे.

येथे येणाऱ्यांच्या स्रावाचे नमुने घेणासाठी डॉक्टर पीपीई किटचा वापर करतात. दररोज, ३ ते ४ किटचा वापर नमुने घेताना त्याची लागण डॉक्टरांना होऊ नये म्हणून केला जातो. नमुने घेऊन झाल्यानंतर या किटची विल्हेवाट लावताना योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. जर, योग्य काळजी घेतली गेली नाही तर या किटमुळे देखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका असतो.

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

त्यामुळे, पीपीई किटची विल्हेवाट वैद्यकीय कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारामार्फत लावणे गरजेचे आहे. महापालिकेच्या चाचणी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे किट वाहतूक करणाऱ्या घंटागाडीत टाकत असल्याचे, लोकमतच्या वृत्तानुसार समजते.

‘राजकीय हितासाठी कॉपी बहाद्दर सरकारचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ,विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे’