धक्कादायक ! केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; अपघातात नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू

श्रीपाद नाईक

बंगळूरू: कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करत असताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते यल्लपुराहून गोकर्ण येथे प्रवास करत असताना . त्यांची गाडी पलटल्याने हा अपघात झाला.

या अपघातात श्रीपाद नाईक यांच्यासह इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र यामध्ये दुर्दैवाने श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर श्रीपाद नाईक यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले सध्या त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहे.

नाईक यांच्या पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उत्तर कन्नडा जिल्ह्याचे प्रमुख श्रीवरम हेबर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना गोव्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करुन नाईक यांची काळजी घेण्याची विनंती केली आहे. गरज असेल तर दिल्लीला शिफ्ट करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन सर्व व्यवस्था पाहण्याची विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या