धक्कादायक : बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : बुलढाणा शहरात अत्यंत दुर्दैवी सतना घडली आहे. कारमध्ये गुदमरल्याने दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक लहान मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुलढाण्यातून ही तीनही मुलं सोमवारी दुपारी बेपत्ता झाली होती. शोधूनही मुलं सापडली नाहीत तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. एकाच घरातील मुलं असल्यानं पोलिसांना अपहरणाची शक्यता वाटली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता एका कारच्या काचेवर चिमुकलीचा हात दिसला. त्यात तिनही मुलं सापडली. तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांच्यापैकी दोन मुलांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

दरम्यान, राज्यात सध्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत खेळताना एक मुलगा गटारात पडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे.