एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी विकास दुबेच्या दोन साथिदारांच्या मुसक्या आवळल्या

vikas_dubey

मुंबई- कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे. विकास दुबेला (दि.9) उज्जैनमधून अटक करण्यात आली होती. काल उत्तरप्रदेश पोलीस दुबेला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी दुबेने पोलिसांची बंदूक घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांकडून त्याचा खात्मा झालेला आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला मुख्य आरोपी विकास दुबे याला गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पुढील अधिक चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला.

त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारल्याची बातमी पुढे येत आहे. त्यानंतर विकास दुबेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी चेकअप केलं असता त्याला मृत घोषित केलं गेलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

विकास दुबे याच्या दोन साथिदारांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. अरविंद उर्फ गुडड्न रामविलास त्रिवेदी वय-46 आणि सुशिलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी (गुड्डनचा ड्रायव्हर) अशी आरोपींचा नावं आहेत. महाराष्ट्र एटीएसनं ही कामगिरी केली आहे तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी दोन्हा आरोपीच्या मुंबईतून मुसक्या आवळल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘राजकीय हितासाठी कॉपी बहाद्दर सरकारचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ,विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे’

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पुण्यात कलगीतुरा, बापटांनी अजित पवारांवर केली शेलक्या शब्दात टीका

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

महाराजांनी मनं जिंकलं : कोरोनातून बरे होताच दान केला प्लाझ्मा