धक्कादायक : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांना चिरडलं

टीम महाराष्ट्र देशा : जुन्नर तालुक्यातील उदापूर गावाजवळ नगर-कल्याण महामार्गावर सकाळी साडे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये तीनही महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार आहे.

मीराबाई सुदाम ढमाले, कमल महादेव ढमाले, चांगुणा रामभाऊ रायकर या तीन महिला पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत होत्या. चालत असताना अचानक एका अज्ञात वाहनाने या महिलांना धडक दिली. त्यानंतर वाहनचालकाने वाहनासह तेथून पळ काढला. ही धडक इतकी जबरदस्त होती की या धडकेत तीनही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे, त्याच्या विरोधात ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस फरारी चालकाचा शोध घेत आहेत.