धक्कादायक : चुलत भावाचे शीर कापले आणि पोहोचले पोलीस ठाण्यात

crime

टीम महाराष्ट्र देशा :  तेलंगणामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी चुलत भावाची हत्या केली. त्यानंतर त्याचं शीर धडापासून वेगळं केलं. ते कापलेलं शीर घेऊन ते स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले आणि गुन्ह्याची कबुली दिली.

तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात आरोपी मोहम्मद गौस आणि इरफान यांनी चुलत भाऊ शेख सद्दाम ऐकत नाही म्हणून त्याची नारळ सोलणाऱ्या चाकुने हल्ला करत गळा कापला आणि शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर ते शीर घेवून पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, इरफान आणि मोहम्मद गौस यांची बहीण रजिया हिला शेख सद्दामकडून दोन मुलं होती. शेख सद्दामने आपल्या मुलांचा सांभाळ करावा अशी इरफान आणि मोहम्मद गौसची इच्छा होती परंतु सद्दाम त्यांचे ऐकत नव्हता त्यामुळेच त्यांनी त्याची हत्या केली.