औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील १२९८ पैकी ११७६ गावांमध्ये नळ योजना कार्यान्वित आहे. तर १२२ गावामंध्ये नळ योजना नाही. स्वतंत्र नळ योजना ९२६, प्रादेशिक पाणी पुरवठा १६ गावांमध्ये आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्राथमिक आराखड्यानुसार अ वर्गवारीत ३४१, ब वर्गवारीमध्ये ४९६ आणि नव्याने प्रस्तावित योजनेत ४१५, सोलार योजनेत ११३ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये गावकृती आराखडे पूर्ण झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
जलजीवन मिशनच्या सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रत्यक्ष कामांना अधिक गती द्यावी. कामांचे सर्वेक्षण जानेवारी आणि डीपीआर मार्च अखेर पूर्ण करावेत. मिशन अंतर्गत असलेली कामे वेळेत, दर्जेदाररित्या पूर्ण करून नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि शाश्वत पाणी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मिशनअंतर्गत असलेल्या अ वर्गवारीतील ४२ गावांच्या डीपीआरला यावेळी मंजुरीही देण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह, जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास प्रती माणसे किमान ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणी वाटप समितीच्या निर्णयाप्रमाणे अंदाजे अंदाजपत्रके तयार करण्यात आलेली आहेत. अ, ब वर्गवारीतील सर्वेक्षण १५ जानेवारी, क वर्गवारीतील ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करावे.
अ वर्गातील ३० जानेवारी, ब वर्गातील १५ फेब्रुवारी आणि क वर्गातील ३१ मार्चपर्यंत डीपीआर आवश्यक त्याबाबींसह सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. डीपीआरनंतर पाणी स्वच्छता मिशनची मान्यता प्रक्रिया पार पडेल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेस सुरूवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत केळगाव, चारनेर, सिरसाळा आदींसह पैठण तालुक्यातील गावांना मंजुरीही चव्हाण यांनी यावेळी दिली. बैठकीत गटणे यांनीही विविध सूचना अधिकाऱ्यांना केल्या. मिशनच्या कामांची सविस्तर माहिती वाघमारे यांनी सादर केली.
महत्त्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रमधून गोव्यात गेले अन् भाजपला गळती लागली”, राऊतांचा टोला
- मित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर
- “अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकार तोंडघशी पडले’, १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची टीका
- भाजपच्या त्या १२ आमदारांचं निलंबन कायद्यानेच; राज्यसरकारचा सर्वोच्च न्यायालयात खुलासा
- आमचे वकील गुणरत्न सदावर्तेच; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या आवाहनाला केराची टोपली..!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<