धक्कादायक: दिल्लीतील व्हेंटिलेटर सुस्थितीत तर मुंबईहून आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये सॉफ्टवेअरच नाही!

mumbai hospital

अमरावती : अमरावती जिल्हा कोरोना रुग्णाचा हॉटस्पॉट बनलेला आहे. ही संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसतानाच माजी कृषीमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संपूर्ण पाहणी केल्यानंतर तेथील डॉक्टर यांच्या माहितीनुसार रेमडेसीवीर हे इंजेक्शनची मागणी 500 असताना 12 उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे. हे इंजेक्शन रुग्णांचे प्राण वाचवू शकते. त्याचीच कमतरता येथे दिसून आली. दिल्ली येथून आलेले व्हेंटिलेटर चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु, मुंबईवरून आलेले व्हेंटिलेटरचे सॉफ्टवेअर त्यांनी पाठविले नाही, त्यामुळे ते काम करू शकत नाही. त्यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

ह्या कोविड सेंटरमध्ये सफाई कर्मचारी व वॉर्ड अटेंडन्स संख्या मोठ्या प्रमाणात कमी आहे. ती संख्या वाढविण्यासाठी व इतर सुविधे संदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी सुद्धा डॉ. अनिल बोंडे यांनी चर्चा केली. ह्यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशी चर्चा करून ह्या समस्या निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे डॉ. अनिल बोंडे सांगितले.

महत्वाच्या बातम्या:-