fbpx

धक्कादायक : ‘मृत्यू कसा होतो’ हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्याने केली आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा : मृत्यू नेमका कसा होतो हे जाणून घेण्यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रिशी जोशुआ असं विद्यार्थ्याचं नाव असून तो एम.ए सेकंड इअरचा विद्यार्थी होता. त्यानं खोलीतील पंख्याला फाशी घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यानं आत्महत्या करत असल्याचा मेल आपल्या प्राध्यापकांना पाठवला होता.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक मेल प्राध्यापकाला केला होता. सकाळी ११ .३१ वाजता हा मेल करण्यात आला. त्यात ‘जेव्हा तुम्हांला माझा हा मेल मिळेल तेव्हा मी या जगात नसेन. खूप दिवसांपासूनची इच्छा आहे मृत्यू प्रत्यक्षात कसा आहे, हे बघण्याची. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या’, असे त्याने म्हटले होते. यामुळे कदाचित मृत्यूनंतरचे रहस्य जाणून घेण्यासाठीच त्याने आत्महत्या केली असावी हे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या मेलवरून आत्महत्या केल्यानंतर आपण कधीही परतणार नाही हे देखील त्याला चांगले माहीत होते हे देखील स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाली तेव्हा जोशुआचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी सर्वप्रथम खिडकीतून सारी परिस्थिती लक्षात घेतली. त्यानंतर कटरनं केबल कापून मृतदेह खाली उतरवला गेला. त्यानंतर रूग्णालयात मृतदेह पाठवत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना याबद्दलची माहिती दिली गेली. यामध्ये कोणत्याही घातपाताची शक्यता नाही. यामध्ये प्रेम प्रकरणाचा तर संबंध नाही ना? याबद्दल देखील पोलिस आता चौकशी करत आहेत