धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू

ratnagiri

भुसावळ : जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डातील ऑक्सिजन शुक्रवारी संपला होता. त्यामुळे गोंधळ उडून रुग्णालयातील १२ बाधितांना साकेगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात हलवण्यात आले. दरम्यान, ही प्रक्रिया सुरू असताना ३६ वर्षीय महिला रुग्णाचा रुग्णालयात नेताना गारखेड्याजवळ मृत्यू झाला. त्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच नातेवाइक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले.

भुसावळ जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात १८ बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. ३५ ऑक्सिजन सिलिंडरची गरज असताना दररोज केवळ २० ते २५ सिलिंडरचाच पुरवठा होत आहे. त्यामुळे शुक्रवारी परिस्थिती बिघडली. सकाळी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती कळवली. तरीही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे २० पैकी १२ रुग्णांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी शासकीय व खासगी मिळून आठ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली. एका रुग्णवाहिकेत दोन अशा प्रकारे रुग्णांना ऑक्सिजन लावून रवाना करण्यात आले. रुग्णांना हलवताना ढालसिंगी येथील महिलेची ऑक्सिजन पातळी दाखल केल्यापासून खालावली होती. परिस्थिती नाजूक असल्याने या महिलेला १०८ रुग्णवाहिकेत टाकून ऑक्सिजन लावून डॉ. पाटील रुग्णालयात नेण्यात येत होते. पण गारखेड्याजवळ या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे रूग्णवाहिका पुन्हा जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणली गेली. या वेळी संतप्त नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला.

महत्वाच्या बातम्या

IMP