धक्कादायक! कार्यालयाच्या पाण्याच्या टाकीत सापडला तरुण कर्मचाऱ्याचा मृतदेह

लातूर: शहरातील पाच नंबर चौकातील असलेल्या कायझन होंडा शो-रूमच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह शो-रूमच्या छतावरील असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला होता. या प्रकारामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुशांत चंद्रकांत कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून या शो-रूममध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. हा घात आहे की अपघात हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

निक्की बारच्या मागील राजे शिवाजीनगर येथील राहिवाशी सुशांत चंद्रकांत कांबळे (वय २९) हा बार्शी रोड वरील ५ नंबर चौकातील कायझन होंडा या चार चाकी गाड्यांच्या शोरूम मध्ये ऑफीस बॉय म्हणून कामाला होता. एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन रात्री दीड वाजन्याच्या सुमारास ही घटना घडली. सुशांतचा मृतदेह शोरूमच्या छतावरील एक हजार लिटर पाण्याच्या टाकीत पालथ्या अवस्थेत आढळून आला.

पहाटे पोलिसांनी सदर पाण्याची टाकी फोडून मयत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. मयताचा भाऊ आकाश चंद्रकांत कांबळे याने दिलेल्या माहिती वरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हेड कोन्स्टेबल राजेंद्र देशमुख पुढील तपास करीत आहेत. शो-रूमच्या छतावरील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्यामुळे अनेक उलट सुलट चर्चा सध्या होत आहेत. नेमका हा घातपात आहे की अपघात हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP