धक्कादायक! रॉबीन्सन पाठोपाठ आणखी एक खेळाडुच्या वर्णद्वेषी टिप्पणीचे जुने ट्विट समोर

मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड या दोन संघातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यास इंग्लंडला यश आले. मात्र या सामन्यात पदार्पण करणारा इंग्लंडचा गोलंदाज ओली रॉबिन्सनला चांगली कामगिरी करुनही निलंबन करण्यात आले. कारण २०१२-१३ साली रॉबिन्सनने काही अक्षेपार्ह ट्विट केले होते.

आठ वर्षापुर्वी ओली रॉबिन्सनने सोशल मीडीयीवर लैंगिकता आणि वर्णद्वेषाबद्दल टिप्पणी केली होती. पहिल्या सामन्यादरम्यान ती समोर आली त्यामुळे ईसिबीने त्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याला निलंबीत केले. मात्र हा वाद शमण्याआधीच आणखी एका इंग्लिंश खेळाडुचे नाव समोर आले आहे. या खेळाडुने देखील किशोरावस्थेत असताना आपत्तीजनक सोशल मीडिया टिप्पणी केल्या होत्या. मात्र या खेळाडुचे नाव अद्यापही समोर आले नाही.

या खेळाडुने जेव्हा हे ट्विट केले होते तेव्हा तो १६ वर्षाचा देखील नव्हता अशी माहिती समोर आली आहे. मात्र ओली रॉबिन्सनमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणात ईसीबीने चौकशी देखील सुरु केली आसल्याची माहिती समोर आली आहे. तर या खेळाडुवर आरोप सिद्ध झाले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे ईसीबीने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP