धक्कादायक! ‘मृतदेहांसोबत रॅली काढा’, ममतांची ऑडिओ क्लिप व्हायरल

bengal mamta

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेसाठी काल शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, याच दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका ध्वनिफितीने मोठा वाद निर्माण झाला आहे. एका ऑडिओ क्लिपमध्ये ममता आपल्या उमेदवाराला कूचबिहार जिल्ह्यात ‘सीआयएसएफ’च्या गोळीबारात ठार झालेल्या ४ जणांच्या मृतदेहांसोबत रॅली काढण्याचे निर्देश दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराने बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपने या प्रकरणी निवडणूक आयोगाची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही ऑडिओ क्लीप प्रसिद्ध केली आहे. या क्लिपमध्ये ममता सीतलकुची विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार पार्थ प्रतिम राय यांच्यात संवाद आहे. त्यात ममता, राय यांना सीआयएसएफच्या गोळीबारात ठार झालेल्या ४ जणांच्या मृतदेहांसमवेत रॅली काढण्याची सूचना करताना दिसून येत आहेत. मालवीय यांनी या प्रकरणी ममतांवर टीका केली आहे.

‘ममता केवळ अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी राज्यात भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या राज्यात जातीय दंगल घडवून त्याचे खापर पोलीस व केंद्रीय दलांच्या कर्मचाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एखाद्या मुख्यमंत्र्याकडून अशी अपेक्षा करता येईल काय? असे ते म्हणाले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ममतांवर निशाणा साधून या क्लीपमुळे तृणमूलची गिधाड संस्कृती समोर आल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या