मुंबई : रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला आहे.यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जे सरकारला हवे होते तेच घडवून आणण्यात आले’
- रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकित
- मोहम्मद शमीने वडिलांच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला.
- विराट-रोहितचा दबदबा कायम; विराट नंबर वन वर तर रोहित.
- सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलने दिले मोठे अपडेट्स