धक्कादायक! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात सर्वाधिक गुन्हे

२२ पैकी तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे

नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करण्यात आलं. नुकतीच निवडणूक आयोगाने गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे विरोधकांसाठी हा चर्चेचा विषय बनला आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

देशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर ११ तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर २२ गुन्हे दाखल असून त्यातील तीन गंभीर स्वरुपाचे आहेत.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुका लढवण्यावर बंदी?

Shivjal