धक्कादायक: ऊसात फॉर्म फेकून देत पिक विमा कंपनीचा प्रतिनिधी फरार, नांदेडमधील घटना

धक्कादायक: ऊसात फॉर्म फेकून देत पिक विमा कंपनीचा प्रतिनिधी फरार, नांदेडमधील घटना

crop insurance company

नांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडापासून जवळच असलेल्या आंतरगाव येथे एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात विमा कंपनीच्या प्रतिनिधीने फॉम फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बरबडा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी विमा कंपनीला फोनद्वारे, ॲप द्वारे, मेल द्वारे व ऑफलाईन अर्ज द्वारे पिकाच्या नुकसानीची माहिती कळवली आहे. गावागावात पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आल्यानंतर झालेल्या पिकाचे सर्वे करणे हे प्रमुख काम आहे. पण, विमा कंपनीचे गावोगाव नेमलेले प्रतिनिधी शेतकऱ्याकडून पैशाची मागणी करत होते. तसेच अनावश्यक सर्व कागदपत्रे मागणी करून शेतकऱ्याची दिवसाढवळ्या लूट करत होते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

गावातील शेतकरी या कंपनीच्या प्रतिनिधीच्या मागे कामधंदे सोडून दिवसभर फिरत होते. यामुळे सुध्दा रोजगार बुडत आहे. आधीच शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठा फटका बसलेला आहे. त्यात कंपनीचे प्रतिनिधीने ऊसात फॉम फेकून दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यासंबंधी तहसीलदार शिंदे यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क केला असता या विषयी विमा कंपनीकडे खुलासा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, इफको विमा कंपनी जिल्हा प्रमुख यांना कळविले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देत होते. असे आंतरवर गावातील शेतकरी म्हणाले. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने तात्काळ याची दखल घेऊन विमा कंपनीला ही नौटंकी बंद करायला सांगावे. आंतरगावातील विमा कंपनीने व सरसकट सर्वे करावा. नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा संभाजी शिंदे, गजानंद शिंदे व आंतरगावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या