धक्कादायक ! ‘याठिकाणी’ चार पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

औरंगाबाद : पिशोर येथील पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिशोर पोलिस ठाण्यात कार्यरत एका महिला कर्मचार्‍याला सोमवारी (दि.१) कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे आता उर्वरित कर्मचार्‍यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

बुधवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात महिला कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांच्या जवळच्या संपर्कातील इतर दहा कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी (दि.५) प्राप्त झाला. त्यात आणखी एक महिला कर्मचारी व दोन पुरुष कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा जोमाने वाढत आहे. आता कोरोना योद्धे देखील पुन्हा एकदा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत.

त्यामुळे उर्वरित सोळा कर्मचार्‍यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल लवकरच प्राप्त होतील. कोरोना योद्धांचे कर्तव्य बजावतांना आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. पिशोर पोलिस ठाण्यातील केवळ सहा कर्मचार्‍यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यातील एकही कर्मचारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये समाविष्ट नाही.

महत्त्वाच्या बातम्या