धक्कादायक : पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

murlidhar mohol

पुणे : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. पुण्यात देखील दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात कमालीची वाढ होत आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कालच पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता मोहोळ यांच्या कुटुंबातील आणखी आठ सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

या सर्व प्रकारामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जणांना कोरोना झाला आहे. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे. मोहोळ यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारा दरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील’. या आशयाचे ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, परवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोहोळ उपस्थित होते. या बैठकीला राज्यमंत्री दत्तामामा भरणे तसेच महापालिका आयुक्त आणि अनेक आजी-माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. त्यामुळे या नेत्यांची काळजी वाढली आहे.

दरम्यान, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली. योगेश टिळेकर यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारीणीत टिळेकर यांची ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.’दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने माझी व मुलाची कोविड तपासणी करुन घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.’ असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.

पुणे : काल महापौर तर आज भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह

अरे देवा… राज ठाकरेंच्या घरात कोरोनाचा प्रवेश

…तर इंदुरीकर महाराजांना होणार शिक्षा, सरकारी वकिलांचा दावा