धक्कादायक ! संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक ?

वेबसाइट हॅक

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वेबसाईटवर काही चीनी अक्षरे दिसून येत आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या वेबसाइट हॅक झाली असेल तर याबाबत कठोर पावले उचलल्या जातील.

संरक्षण मंत्रालयाची https://mod.nic.in हि वेबसाइट हॅक झाल्याची माहित समोर आल्यानंतर चौकशी नंतर एनआईसीने वेबसाइट हॅक झाले नसल्याचे सांगितले आहे. नेशनल साइबर सिक्युरिटी को-ऑर्डिनेटर गुलशन राय म्हणाले ”सरकारची वेबसाईट हॅक झाली नाही तसेच हा कोणताही सायबर हमला नाही. सिस्टम मध्ये हार्डवेयर चा प्राब्लेम आहे. लवकरच वेबसाईट परत चालू होईल.”