वोडाफोन, एअरटेल आणि आयडीया कंपन्यांचा धक्कादायक निर्णय

महाराष्ट्र देशा टीम : दूरसंचार पुरवणाऱ्या कंपन्या वोडाफोन, एअरटेल आणि आयडिया यांच्या दरात उद्यापासून वाढ होणार आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना आता चांगलाच फटका बसणार आहे. उद्यापासून म्हणजेच ३ डिसेंबरपासून हे दर वाढणार असून ग्राहकांना आता या सेवेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

वेगवेगळे कॉल आणि डेटा प्लॅनमध्ये आता ४२ टक्क्यांनी वाढ होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील या अग्रगण्य कंपन्या आहेत मात्र सध्या या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. या सगळ्या कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहेत. त्यामुळे शेवटी हा निर्णय कंपन्यांना घ्यावा लागत आहे.

सध्या वोडाफोन, एअरटेल आणि आयडिया या मोठ्या कंपन्यांना जिओ बाजारात आल्याने मोठा फटका बसला आहे. गेल्या कित्येक वर्षांनी या तिन्ही कंपन्यांनी हे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कॉल आणि डेटाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे ३ डिसेंबरपासून हे नवे दर लागू होणार असून या सगळ्या कंपन्या आपल्या दरात ४१.२ टक्के वाढ करणार आहे.

आता कॉलला ६ पैसे मोजावे लागणार आहे. तर डेटाला सुद्धा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. हे दर प्रीपेड ग्राहकांना लागू होणार आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून दर वाढवण्याची प्रक्रिया सुरु होती मात्र त्यावर उद्यापासून अमलबजावणी केली जाईल. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना कॉल आणि डेटासाठी अधिक पैसे द्यावे लागेल.

महत्वाच्या बातम्या 

Loading...