धक्कादायक! सीएसकेचा ‘हा’ प्रशिक्षक पुन्हा कोरोनाबाधीत

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने तत्काळ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र यादरम्यान अनेक संघाच्या विविध खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.

स्पर्धा रद्द झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांना कोरोनाची लागण झाली होती. चेन्नई येथे योग्य उपचारानंतर शुक्रवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर ते काही दिवस विलगीकरणात होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे त्यांचा भारतातील मुक्काम पुन्हा काही दिवसासाठी वाढला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना तत्काळ रुग्णवाहीकेद्वारे चेन्नई येथे हलवण्यात आले होते. यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अधिकारी हसीच्या संपर्कात आहे. हसी सध्या त्याच्या हॉटेलच्या विलगीकरणात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP