धक्कादायक : गर्भात असतानाच बाळाला कोरोनोचा संसर्ग;ससून रुग्णालयात घडली दुर्मिळ घटना

Pregnancy

पुणे : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अगदी नवजात बालकापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्व वयोगटातील लोकं या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. मात्र बाळ गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची दुर्मिळ घटना ससून रुग्णालयात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आईकडून बाळाला नाळेद्वारे कोरोनाचा संसर्ग (व्हर्टिकल ट्रान्समिशन ऑफ कोविड) झाल्याची घटना देशात पहिल्यांदाच घडल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.ससून रुग्णालयाच्या बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री विभागाने येथे प्रसूत झालेल्या गर्भवतीकडून तिच्या बाळाला व्हर्टिकल संसर्ग झाला असल्याचे निदान केल्याने ससून रुग्णालय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे.

याबाबत ससून रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांनी सामनाला दिलेल्या माहितीनुसार, एक २२ वर्षीय गर्भवती महिला जून महिन्यात प्रसूतीसाठी ससूनमध्ये दाखल झाली होती. प्रसूतीदरम्यान या महिलेची ‘आरटी-पीसीआर’द्वारे कोरोना चाचणी केली असता, ती निगेटिव्ह आली. त्यानंतर अ‍ॅण्टिबॉडी टेस्ट करण्यात आली. त्यात महिलेला कोरोनाचे निदान झाले. दरम्यान, या बाळाचा जन्म झाल्यानंतर नाकातील स्वॅब घेण्यात आला. त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.

बाळाची आरटी-पीसीआरद्वारे कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात बाळ पॉझिटिव्ह असल्याने त्याला ताप आला आणि इतर लक्षणे दिसल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्या बाळावर तीन आठवडे ससूनच्या निओनेटल आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले आणि नंतर ते बरे झाले. त्यानंतर आई व बाळाला जून महिन्यातील 3 ऱ्या आठवड्यात घरी सोडण्यात आले.

राफेल विमानांचं भारतीय भूमीवर आगमन!

‘राणे तुम्हाला शिवसेनेनं मोठं केलं तरी शिवसेनेवर आणि मातोश्रीवर भुंकताय’, शिवसेना नेत्याची जहरी टीका

नरेंद्र मोदींनी राफेलचं ‘हटके’ ट्विट करत केलं स्वागत

IMP