धक्कादायक: आयपीएल मध्ये कोरोनाची एन्ट्री; ‘या’ खेळाडूला झाली लागण

ipl

नवी दिल्ली : आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा दुसरा भाग सध्या दुबई मध्ये खेळवला जात आहे. हे सामने खेळत असताना खेळाडूंना कोरोनाची लागण होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते मात्र तरीही टी. नटराजन या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

टी. नटराजन हा खेळाडू सनराईझर्स हैद्राबाद या संघाकडून सामने खेळतो. दुखापतीमुळे तो यापूर्वी खेळू शकला नव्हता दरम्यान आज होणाऱ्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यातून तो पुरागमन करणार होता. टी नटराजन याचा सामन्याआधी होणाऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

१४ व्या हंगामाचा पहिला भाग मार्चमध्ये खेळवला गेला होता. त्यावेळी देखील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हि स्पर्धाच रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली होती. दरम्यान आता टी नटराजन कोरोनाबाधित आढळताच हैद्राबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं असून आज होणाऱ्या SRH vs DC सामन्यावर मात्र कोणतं संकट नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या