औरंगाबाद : काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील अनेक शहर तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची निर्बंध लादलेत. पण मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आरोग्य कर्मचारीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. या जिल्ह्याच्या हाकेच्या अंतरावर सोयगाव तालुका आहे. सोयगाव तालुक्याचा जळगावशी मोठा संपर्क आहे. तसेच सोयगाव तालुक्याचाच एक भाग असलेल्या सावळदबारा या भागातील बारा गावांचा विदर्भाशी संपर्क आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग मराठवाड्यात प्रवेश करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पण या तालुक्यात आरोग्य यंत्रणा संपुर्णपणे कोडमळली आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अधिकारी आणि कर्मचारीच नसल्याने कामकाज शून्यावर आले आहे. तसेच शाळांमध्येही विनामास्क विद्यार्थी सर्रास बसत आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. जर कुणी कोरोना संशयीत आढळला तर जिल्हा परिषदेच्या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांत संशयित रुग्णांच्या तपासण्या ठप्प असल्यामुळे रुग्णांना खासगी ठिकाणी कोरोना चाचणी करावी लागते. अशी खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असताना आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाल्याने चिंता व्यक्त होतेय.
महत्वाच्या बातम्या
- मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आमदार अंबादास दानवेंचा उद्घाटनाचा सपाटा
- फेसबुक आणि ऑस्ट्रेलिया सरकार मधील वाद शमाला फेसबुकची सेवा पूर्ववत
- स्वतः शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचं ट्रेंड राजकारणात सुरु झालाय; चित्रा वाघ यांचा घणाघात
- लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाडचा जामीन फेटाळला, कोठडीत रवानगी
- संजय राठोड यांनी आरोप धुडकावले, म्हणाले…