धक्कादायक : भारतात २०४० पर्यंत कॅन्सर पेशंटची संख्या दुपटीने वाढणार

टीम महाराष्ट्र देशा : दी लान्सेट ऑन्कोलॉजीच्या अहवालानुसार २०४० पर्यंत भारतात कॅन्सरग्रस्त पेशंटच्या संखेत दुपटीने वाढ होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या ९८ लाख पेशंट आहेत त्यांच्या संखेत वाढ होऊन २०४० पर्यंत आकडा १.५ कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.

कॅन्सर हा गंभीर आजार आहे. दिवसेंदिवस कॅन्सरची व्यापकता वाढत आहे. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. त्यात तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर हे महत्वाचे प्रकार आहेत. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हवामान या गोष्टीमुळे भारतात कॅन्सरच्या रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात कॅन्सरचे रुग्ण फार कमी आढळतात.

दरम्यान, भारतात ग्रामीण भागात महिलांना प्रामुख्याने गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. तर शहरी भागात स्तन कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून वाचण्यासाठी रुग्णांनी योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे.