धक्कादायक : भाजप आमदाराला कोरोनाची लागण

bjp

गांधीनगर : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असताना आता अनेक नेते आणि सेलिब्रेटी देखील या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. नरोदाचे आमदार बलराम थवानी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्यात एका लोकप्रतिनिधीला कोरोनाची होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यांना सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे.

एका बाजूला हे प्रकरण ताजं असताना भाजपचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतपाल महाराज यांचे रिपोर्ट कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा रिपोर्ट समोर येण्याआधी सतपाल महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला एक दिवस आधी उपस्थित होते. रविवारी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजमधून घोर निराशा झाली : पृथ्वीराज चव्हाण

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ, गॅस सिलेंडर महागले

गणेश मूर्तीकारांना दिलासा ! पीओपीच्या मूर्तीवरील बंदी एक वर्ष स्थगित : जावडेकर