मॉस्को: सध्या राज्यात कोरोना विषाणू पुन्हा सक्रीय झाला असून याच काळात कोंबड्यांना बर्ड फ्लू चा धोका निर्माण झाला आहे. तर बर्ड फ्लूमुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होत नाही. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्यांना पारितोषिक दिले जाईल, असे आवाहन पशुसंर्वधन, दुग्धविकास व मत्सविकास मंत्री सुनील केदार यांनी केले होते.
दरम्यान आता रशियामधून या संदर्भात धक्कदायक बातमी आली आहे. बर्ड फ्लू विषाणू प्रथमच मानवी शरीरात आढळला असून सात व्यक्ती या विषाणूने बाधित असल्याचे समोर आले आहे. हे सातही जण एका पोल्ट्री फार्ममधील कामगार आहेत. या कामगारांमध्ये रशियाच्या शास्त्रज्ञांना एच५एन८ एन्फ्लूएन्झा A टाईप गटातील विषाणू आढळून आल्याने चिंता वाढली आहे. एच५एन८ या विषाणूमुळे बर्ड फ्लूचा संसर्ग होतो. पक्ष्यांमधील हा आजार आता माणसांत पोहचला आहे.
रशियाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. रशियाच्या दक्षिण भागातील एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली. या सर्व कामगारांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सातही कामगारांना सौम्य लक्षणे असून प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी भारतातही बर्ड फ्लूने थैमान घातले होते. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यात अचानकपणे पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. अनेक स्थलांतरित पक्षी मृत्यूमुखी पडले होते. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत स्पष्ट झाले होते. राज्यातील नंदुरबार जिल्ह्यासह अनेक भागात पोल्ट्री पक्ष्यांचा मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूच्या बंजारा लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ
- खबरदार! विनामास्क ‘एसटी’त चढाल तर
- शिर्डीला जात असाल तर ही बातमी वाचाच, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे घेतला मोठा निर्णय
- डॉक्टर असूनही औषधाचा प्रचार कसा करता ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ‘आयएमए’ने फटकारले
- साहेब पिक वाया गेले, आतातरी अनुदान वाटप करा!