fbpx

धक्कादायक : मतदानाच्या एक दिवस आधीच मतदारांच्या बोटांवर शाई

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यांतील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. अशातच उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या आधीच मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशातील चंदौली लोकसभा क्षेत्रातील ताराजीवनपूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मत न देण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप लावला आहे. मत देण्यासाठी आम्हाला केवळ पैसेच दिले नाहीत तर मतदान करु नये म्हणून बोटाला शाई देखील लावण्यात आल्याचे गावकरी सांगतात. कोणाला याबद्दल सांगू नका असे म्हणत ५०० रुपये दिल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. तसेच यातील दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.