fbpx

धक्कादायक : पुण्यात आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून जावयावर झाडल्या गोळ्या

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून जावयावर ५ गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणावर तिघांनी भरचौकात गोळीबार केला आहे.

तुषार प्रकाश पिसाळ याने आंतरजातीय विवाह केला आहे. या गोष्टीचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. तुषार याच्यावर गोळीबार झाल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तुषार पिसाळचे चुलत सासरे राजू तावरेसह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तुषारवर गोळीबार झाला त्यावेळी चांदणी चौकात बंदोबस्तावर असलेले पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी तुषारला हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतु तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.