धक्कादायक! तहसीलदारांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

बीड: अवैधरित्या वाळुची तस्करी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे, या वाढत्या तस्करीला वेळेत आळा न घातल्याने तहसीलदारांवर संकट ओढवले, अवैधरित्या वाळुची तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरचा पाठलाग करत असताना एका ट्रॅक्टर चालकाने स्वत:च्या ताब्यातील ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीवर घालण्याचा प्रयत्न केल्याने ट्रॅक्टरची तहसीदारांच्या गाडीला धडक झाली यामध्ये तहसीलदारांच्या गाडीचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले मात्र तहसीलदार शिरीष वमने हे बालबाल बचावले.

सदरची घटना मंगळवारी सकाळी ११.३0 वाजेच्या दरम्यान ढेकणमोहा जवळ घडली. दरम्यान दोन ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. बीडचे तहसीलदार वमने दोन मंडळ अधिकाऱ्यांसोबत ढेकणमोहाकडे जात असताना त्यांना वाळुची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर दिसले.

तहसीलदार शिरीष वमने यांनी संबंधित ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला असता ट्रॅक्टर चालकांनी आपले ट्रॅक्टर ढेकणमोहा गावामध्ये घातले. त्यावेळी तहसीलदारांची गाडीही त्या दिशेने गेली. त्याचवेळी एका ट्रॅक्टर चालकाने स्वत:च्या ताब्यातील ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या गाडीच्या दिशेने भरधाव वेगात आणले. त्यामुळे तहसीलदारांना काही दुखापत झाली नाही, याचे समाधान व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या