धुळे : सामूहिक हत्याकांडामधील  ‘त्या’ ५  मृतांची ओळख पटली

youth-crime-

धुळे : राज्यातील विविध भागात मुलं पळवणाऱ्या  टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण आहे. यातूनच मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. अशीच एक घटना धुळ्यातील साक्री तालुक्यात काल घडली होती. यात जमावाने केलेल्या मारहाणीत ५ जण ठार झाले होते .दरम्यान त्या सर्व मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं  असून, मृतांपैकी सर्व जण सोलापूर तालुक्यातील असून, भिक्षा मागून व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे. साक्री तालुक्यातील राइनपाडा या गावात ही घटना घडली होती .

रविवारी दुपारी बाजाराच्या ठिकाणी एका टेम्पोमधून काही लोक आले होते. सुरुवातीला स्थानिक लोकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा समज झाला. त्यानंतर सर्वत्र ही अफवा पसरली त्यामुळे या व्यक्तींभोवती जमाव वाढत गेला आणि त्यांनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाकडून बेदम मारहाण झाल्यानं  अखेर यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त आणि आक्रमक झालेल्या जमावामुळे काही वेळातच या व्यक्तींचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून कोणतीही शहानिशा न करता केवळ अफवेमुळे बेदम मारहाण करणारे लोक कोण होते. यांचा तपास ते घेत आहेत.

मांजरावरील वादातून महिलेचा खून

धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून ५ जणांची हत्या