धक्कादायक! बीड जिल्हा; पंधरा महिन्यांत ३८ शेतकऱ्यांची आत्महत्या

बीड: आधीच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर आणि त्यात आस्मानी संकट यामुळे शेतकरी दुहेरी समस्येत अडकला आहे. त्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या ३८ शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ या १५ महिन्यांत आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. त्यापैकी शासनाच्या निकषात पात्र ठरलेल्या केवळ २४ शेतकऱ्यांच्याच कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मिळाली आहे. तर सहा शेतकरी आत्महत्या तालुका व जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरवल्या आहेत.

कोरडा आणि ओल्या दुष्काळामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. दुसऱ्या बाजूला शेतात केलेली मेहनत आणि खर्च वाया जात असून त्यात पेरणीसाठी घेतलेले कर्जही फेडता येत नसल्याने हतबल झालेल्या काही शेतकऱ्यांनी, तर सततच्या नापिकीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्याचे पाऊल उचलले.

त्यामुळे तालुक्यातील तब्बल ३८ शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ मार्च २०२१ या १५ महिन्यांच्या कालावधीत आत्महत्या केल्या. यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रमाण अधिक आहे. तर शेतकरी आत्महत्येनंतर तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावावर तालुका आणि जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करून संबंधितांच्या अहवालावरून पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या :