fbpx

धक्कादायक : नदीकिनारी सापडली तब्बल २००० आधार कार्ड

aadhar karj mafi online adhaar

टीम महाराष्ट्र देशा : तमिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात नदीकिनारी तब्बल २००० आधारकार्ड सापडल्याची घटना घडली आहे. एका लहान मुलाला खेळताना एक पिशवी सापडली त्यात ही आधारकार्ड होती.

देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे ओळखपत्र आहे. त्याची काळजी घेणे ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे कारण आधार कार्डची गरज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी भासत असते. यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI हे १२ अंकी कार्ड जारी करतं. हे एक डिजीटल आयडी प्रुफ आहे, याच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकता.

दरम्यान, मुल्लियारु नदीच्या किनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी एक लहान मुलगा खेळत होता. त्याचवेळी त्याला एका प्लास्टिकच्या पिशवी सापडली. या पिशवीत जवळपास दोन हजार आधारकार्ड होती. त्याने ही पिशवी त्याच्या आई-वडिलांकडे दिली. त्यानंतर ती पिशवी पोलिसांकडे देण्यात आली. त्यानंतर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

नदीच्या किनाऱ्यावर सापडलेले हे सर्व आधारकार्ड कट्टीमेंडू, आथीरांगम, वाडापथी, सेक्कल या गावातील नागरिकांचे आहेत. मात्र पोस्टातील कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी वितरण न केल्याने ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे याबाबत पोस्टातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.