इंदुरीकर महाराजांना धक्का! ‘अंनिस’लाही मिळणार बाजू मांडण्याची संधी

Indurikar maharaj

संगमनेर : पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

संतती प्राप्तीसाठी वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरोधात दाखल खटल्यात आपल्यालाही बाजू मांडू द्यावी यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर आज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी बचाव पक्षाच्या वकीलांनी अंनिसच्या याचिकेला कडाडून विरोध केला, मात्र सरतेशेवटी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश डी.एस.घुमरे यांनी सदरची हस्तक्षेप याचिका मंजूर करतांना ऍड. रंजना गवांदे यांना अंनिसच्यावतीने लेखी स्वरुपात बाजू मांडण्याची परवानगी दिली. या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून आहेदोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश डी.एस.घुमरे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने ऍड.रंजना गवांदे यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका मंजूर केली.

मात्र त्याचवेळी या खटल्यात त्यांना केवळ लेखी स्वरुपातच म्हणणे सादर करता येईल अशीही अट घातली. त्यामुळे यापुढील सुनावण्यांमध्ये इंदुरीकरांच्यावतीने ऍड.के.डी.धुमाळ तर सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकीलांसह ऍड.रंजना गवांदेही कायद्याची बाजू मांडणार आहेत. यानंतरची पुढील सुनावणी 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-