फडणवीसांना धक्का! जलयुक्त शिवार योजनेच्या १ हजार कामांची चौकशी होणार

मुंबई :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्त्वकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेचे काम अडचणीत सापडले आहे. योजनेतील जवळपास एक हजार कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना पेव फुटले आहे. फडणवीस यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक मानली जात आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच कॅगनेही यावर ठपका ठेवला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडडी सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जवळपास एक हजार कामांची खुली चौकशी केली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या एक हजार कामांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यापैकी तब्बल ९०० कामांची एसीबीच्या माध्यमातून चौकशी होणार आहे, तर उर्वरित शंभर कामांची विभागीय चौकशी होणार आहे.

ऑक्टोबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळाने ‘जलयुक्त शिवार’ योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. कॅगने ‘जलयुक्त शिवार’ योजने अंतर्गत भूजल पातळी वाढली नाही, असा ठपका कॅगने ठेवला होता. जलयुक्त शिवार योजनेत ९ हजार ६३३ कोटी रुपेय खर्च करण्यात आले. मात्र पाण्याची गरज भागवण्यात आणि भूजल पातळी वाढवण्यात सरकारला अगदी थोडं यश मिळावं, असं कॅगने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. २६ जानेवारी २०१५ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची सुरूवात केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP