काँग्रेसला झटका ! कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबमध्ये स्थापन करणार नवा पक्ष

काँग्रेसला झटका ! कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबमध्ये स्थापन करणार नवा पक्ष

अमरिंदर सिंग

नवी दिल्ली : पंजाबच्या राजकारणात मंगळवारी आणखी एक भूकंप झाला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी यांनी मंगळवारी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. भाजपासह इतर पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन ते या पक्षाची स्थापना करणार आहेत.

अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदी डावलल्याने व मुख्यमंत्री निवडीसाठी त्यांच्या मताचा पक्षश्रेष्टींनी विचार न केल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी त्यांची मानधरणी केल्यानंतर ते राजी झाले होते. मात्र काही दिवसांतच त्यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पुन्हा नाराजी व्यक्त केली होती.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट करत कॅप्टन अमरिंदर सिंग नवीन पक्षा स्थापन करणार असल्याची माहिती ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

रवीन ठुकराल ट्विटमध्ये म्हणाले, ‘पंजाबच्या भविष्याची लढाई सुरू आहे. मी लवकरच स्वतःच्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार आहे. हा पक्ष पंजाबमधील लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल, जे मागील एका वर्षापासून संघर्ष करत आहेत’, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या