चोली के पिछे क्या है? ऐवजी आता ‘कमळा’च्या खाली काय आहे ते पाहण्याची गरज – शोभा डे 

नवी दिल्ली : शोभा डे या आपल्या वादग्रस्त ट्विट, आणि वक्तव्यासाठी कायमच चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा शोभा डे या आपल्या वादग्रस्त ट्विटवरून चर्चेत आल्यात. पोटनिवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवावर टीका करताना त्यांनी चोली के पिछे क्या है? ऐवजी आता ‘कमळा’च्या खाली काय आहे ते पाहण्याची गरज आहे. कमळाच्या खाली चिखल असतो हे आपल्याला ठाऊक आहेच  असं  वक्तव्य केलं आहे.

Loading...

कैराना येथील पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला त्यावरूनही शोभा डे यांनी भाजपावर टीका केली आहे. या पराभवासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत असे त्यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळात काय कामे केली? फेविकॉल चीफ मिनिस्टरशिप असे म्हणत त्यांच्यावरही डे यांनी टीका केली. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावरही त्यांनी टीका केली आहे.Loading…


Loading…

Loading...